शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

देवाच्या देवळातच चोर

NDND
एक माळी आपल्या दोन नोकरांना सोबत घेऊन आपल्या बागेत काम करती असे. एक दिवस त्याचे फावडेच चोरीला गेले. त्याने दोन्ही नोकरांकडे चौकशी केली. परंतु फावडे चोरल्याचे दोघेही कबूल करती नव्हते. मात्रा आपले फावडे या दोन नोकरांपैकी कुणीतरी एकाने चोरल्याची माळ्याला खात्री होती. या दोघांनाही शहरातल्या मोठ्या प्रसिद्ध देवळात नेऊन शपथ घ्यायला लावली तर ते देवाच्या भीतीने खोटी शपथ घेणार नाहीत. ज्याने फावडे चोरले तो चोरी कबूल करील असे माळ्यातला वाटले. म्हणून त्या दोघांना घेऊन काहीतरी कामाचे निमित्त काढून तो त्या शहरात आला.

NDND
'शहरात आलोच आहोत तर देवदर्शन घेऊया.' त्याने नोकरांना सांगितले. दोघांनाही देवळात उभे करून देवासमोर फावडे न चोरल्याची शपथ घ्यायला लावायचा त्याचा विचार होता. तिघेही देवळाजवळ आले. देवळाच्या दारातच दवंडीवाला दवंडी पिटत होता. ''देवाच्या देवळात फार मोठी चोली झाली आहे. जो कुणी चोराचा पत्ता लावील त्याला भलं मोठं इनाम दिलं जाईल.'' दवंडी ऐकून माळी दाराचत थबकला.

प्रत्यक्ष देवासमोर देवाच्या देवळात चोरी होते देवाला न घाबरता, तर हे दोघे सहज खोटी शपथ घेतील. म्हणजे आपले चोरीला गेलेले फावडे देव शोधून देण्यास असमर्थ आहे. तेव्हा काहीही न करता सरळ घरी जाऊन नवीन फावडे खरेदी करून काम सुरू करणे उत्तम.

माळी मनात म्हणाला आणि फक्त देवदर्शन घेऊन सर्वजण परत‍ फिरले.