रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (13:06 IST)

पंचतंत्र कहाणी : कोल्हा आणि जादूचा ढोल

Kids story a
एक वेळेची गोष्ट आहे. एका जंगलात दोन राजांचे युद्ध झाले. त्या युद्धात एक राजा जिंकला तर एक राजा हरला. युद्ध संपल्यानंतर जोरदार वादळ आले. ज्यामुळे युद्धात वाजवण्यात येणारा ढोल जंगलात वाऱ्याने हरवला. व एका झाडाला जाऊन अडकला. जेव्हा पण हवा यायची तेव्हा झाडाची फांदी त्या ढोलला आदळायची. व तो ढोल ढमढम वाजायच्या.   
 
तसेच त्याच जंगलामध्ये एक कोल्हा जेवणाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. व अचानक त्याची नजर एका सश्यावर पडली. कोल्हा शिकार पकडण्यासाठी सावधानतेने पुढे सरकत होता. जेव्हा कोल्ह्याने सशाला पकडण्यासाठी उडी घेतली तेव्हा सश्याने त्याच्या तोंडात गाजर कोंबले. कोल्हा ते गाजर काढून पुढे सरकतो. तेवढ्यात त्या ढोल चा आवाज ऐकू येतो. कोल्हा ढोलचा आवाज ऐकून घाबरून जातो. व विचार करायला लागतो की, त्याने कधीच यापूर्वी हा आवाज ऐकला नाही. आवाजाच्या दिशेने कोल्हा ढोल कडे जातो. व तसेच तो विचार करतो की, हा आवाज करणारा प्राणी नक्की उडणारा आहे की चालणारा.
 
मग तो ढोल जवळ जातो. व त्या ढोल वर हल्ला करण्यासाठी उडी घेतो. तर ढमढम आवाज येतो. ज्याला ऐकून कोल्हा खाली उडी घेतो. व झाडाच्या मागे लपतो. काही वेळानंतर काहीच प्रतिक्रिया मिळत नाही म्हणून तो परत एकदा ढोल वे हल्ला करतो. परत ढमढम असा आवाज येतो. परत तो पळतो. काही वेळ नंतर प्रतिक्रिया येत नाही पाहून कोल्हा स्वतःशी पोटपुटतो की, हा कोणताही प्राणी नाही आहे. 
 
तसेच त्याची भीती नाहीशी होते व तो ढोलवर उभा राहून उडी मारू लागतो.  यामुळे ढोल हलायला लागतो.व लोमकळायला लागतो. ज्यामुळे कोल्हा खाली कोसळतो. व ढोल देखील फाटून जातो. तसेच ढोल मधून स्वादिष्ट जेवण बाहेर पडते.जे पाहून कोल्ह्याला आनंद होतो, व तो त्या स्वादिष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारतो व आपली भूक शमवतो.
 
तात्पर्य- या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की, प्रत्येक गोष्टीची निश्चित वेळ असते. आपल्याला जे हवे आहे ते योग्य वेळी मिळते. 

Edited By- Dhanashri Naik