गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन हाँगकाँग

PR
साहित्य : 800 ग्रॅम चिकन तुकडे केलेले, 50 ग्रॅम आलं बारीक केलेलं, 100 ग्रॅम सिमला मिरची काप केलेले, 200 ग्रॅम कांदे चिरलेले, 200 ग्रॅम कांद्याची जुडी बारीक चिरलेली, 6 सुक्या मिरच्या, 200 ग्रॅम लाल सिमला मिरच्या, 100 ग्रॅम तेल, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे
चिली पेस्ट, 1 चमचा साखर, 1 चमचा विनेगर, 1 चमचा अरोमेट पावडर, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीप्रमाणे, 5 चमचे कॉर्न फ्लॉवर.

कृती : एका भांड्यात तुकडे केलेले चिकन घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर मिसळून फ्राई करून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लाल साबूत मिरची व चिरलेल्या भाज्या टाकून 5 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात चिकन घालून 5 मिनिट शिजत ठेवावे. त्यात सोया सॉस, चिली पेस्ट, साखर, विनेगर व मीठ घालून 3 मिनिट शिजू द्यावे नंतर सर्व्ह करताना त्यात अरोमेट पावडर घालून गरम गरम सर्व्ह करावे.