गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फोटोदुनिया
Written By वेबदुनिया|

राष्‍ट्रपित्याच्‍या अनेक छटा...

PR
जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणा-या राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांच्‍या 140 व्‍या जयंतीनिमित्त संयुक्त राष्‍ट्र संघाने त्‍यांच्‍यावर विशेष टपाल तिकिट प्रसारित केले आहे. या तिकिटाची किंमत एक डॉलर आहे.

मियामी येथील प्रसिध्‍द कलाकार फर्डी पचेको यांनी या तिकिटाचे डिजाइन तयार केले असून यात गांधीजींना वेगवेगळ्या रंगांमध्‍ये दाखविण्‍यात आले आहे.

सत्याग्रहाच्‍या शस्‍त्राने गुलामगिरीच्‍या जोखडातून देशाला मुक्त करणा-या गांधीजींच्‍या कार्यापासून प्रेरणा घेऊन जगात अनेक ठिकाणी मुक्तीसंघर्ष उभा राहिला. त्‍याचे स्‍मरण म्हणून हे तिकिट प्रसारित करण्‍यात आले आहे.