येशिल कधी परतून ?
येशिल कधी परतून ?
जिवलगा, येशिल कधी परतून ?
वाट पाहू किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?
हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला ? गेले बाई भिऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
जिवलगा, येशिल कधी परतून ?
__वि. स. खांडेकर