रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (08:05 IST)

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहता, तर हे नियम जाणून घ्या

एक वेळ असा होता की लग्नासाठी मुलं मुली एकमेकांना आवडणे तर दूर भेटतच नव्हते.कुटुंबाचे लोक लग्न जुळवायची आणि संपूर्ण आयुष्य त्या जोडीदारासह घालवत होते. आता काळ बदलला आहे. सध्या लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. म्हणजे लग्नापूर्वीच ते एकमेकांना ओळखतात. समजून घेतात आवडले तर आयुष्यभराची साथ देतात. अन्यथा वेगळे होतात. जे लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात त्यांना काही गोष्टी माहिती नसतात ज्या मुळे त्यांना काही अडचणींना सामोरी जावे लागते.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
*विवाहित मानले जातील-
बऱ्याचदा आजचे तरुण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, एकमेकांना समजून घेतात,नंतर लग्न करतात.परंतु आपणास हे माहीत नसेल की जर मुले आणि मुली दोघे एखाद्या जोडप्या प्रमाणे एकत्र राहत असतील, झोपत असतील,खात असतील तर ते जोडपं कायदेशीररित्या विवाहित मानले जातील.होय,कायद्यानुसार ते दोघेही विवाहित मानले जातील.  
 
* मुलं वैध मानले जाईल -
 
कायदा म्हणतो की लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या जोडप्या पैकी जोडीदार गरोदर राहिल्या वर त्या मुलाला वैध मानले जाईल.ज्याप्रमाणे विवाहित जोडपे आपल्या मुलांची काळजी घेतात त्याच प्रमाणे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या जोडप्यानं देखील मुलांची काळजी घ्यावी लागेल.    
त्याच प्रमाणे गर्भपात, स्त्रीभ्रूण हत्या या सारखे सर्व कायदे लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लागू आहेत.
 
* बाळ दत्तक घेऊ शकत नाही-
कायद्यानुसार लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणारे जोडपे मुलाला जन्माला घालू शकतात. परंतु ते जोडपे कोणत्याही मुलाला दत्तक घेऊ शकत नाही. कारण कायदा त्यांना असं करण्याचा अधिकार देत नाही. अशा परिस्थितीत जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याला एखाद्या अनाथ मुलाला दत्तक म्हणून घ्यायचे असल्यास ते असं करू शकत नाही. 
 
* फसवणूक- 
जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जोडपे दोघेही कमावत असतील तर परस्पर खर्च दोघांच्या समजावर आधारित असेल. जेव्हा आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे सिद्ध करता आणि   जोडीदारापासून वेगळे होता तर,पोटगीची मागणी करू शकता. जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जोडीदाराने दुसऱ्याचा विश्वासघात केला तर तो दंडनीय गुन्हा मानला जाईल. फसवणूक झाली असल्यास फिर्यादी गुन्हा दाखल करू शकतो आणि त्या मध्ये शिक्षेची तरतूद देखील आहे.