बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (19:40 IST)

वृद्धांसमवेत प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सध्या कोरोनाच्या काळात घरात राहणे सर्वात सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत जर आपण कोणत्या न कोणत्या कारणामुळे प्रवास करत आहात तर आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर आपण मुलांसह आणि वृद्धांसमवेत प्रवास करत आहात तर या गोष्टींची काळजी घ्या. 
 
1 आरोग्याची तपासणी करा- वृद्धांना कोणत्याही प्रवासाला घेऊन जाण्यापूर्वी त्यांची एकदा आरोग्य तपासणी करुन घेणे आवश्यक आहे .  त्यांचे रक्तदाब, मधुमेह  इत्यादी सामान्य असेल आणि आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नसेल तरच त्यांना प्रवासासाठी घेऊन जा,
 
2  तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवास करा-जर आपण ट्रेनने किंवा फ्लाइटने प्रवास करणार असाल आणि ज्येष्ठांसमवेत प्रवास करत असाल तर तिकिट कन्फर्म  झाले असेल तरच प्रवासासाठी जाण्याचा प्रयत्न करा. जर तिकिट किंवा सीट कन्फर्म  झालेली नसेल तर प्रवास करू नका. 
 
3 अत्यावश्यक औषधे जवळ बाळगा -प्रवासा दरम्यान, वृद्धांशी संबंधित सर्व औषधे व काही आवश्यक औषधांसह आपल्याबरोबर प्रथमोपचार बॉक्स ठेवा. वडिलधाऱ्यांची औषधे बॉक्समध्ये व्यवस्थित पद्धतीने ठेवा. बरेच दिवस प्रवास केल्यावर, वृद्धांना अस्वस्थता किंवा अशक्तपणा जाणवू शकतो, म्हणून काही ऊर्जा पेय आपल्याकडे ठेवा. प्रथमोपचार बॉक्समध्ये वेदना निवारक स्प्रे किंवा मलम देखील ठेवायला विसरू नका. 
 
 
4 कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा- सध्याच्या कोरोनाच्या काळात देखील आपल्याला वृद्धांसमवेत प्रवास करावा लागत असेल तर कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा मास्क,सेनेटायझर,ग्लव्स वापरा. वृद्धांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने त्यांची विशेष  काळजी घेणं आवश्यक आहे. 
 
5 स्वत⁚ बरोबर अन्नसामग्री ठेवा- कोरोना काळात बाहेरचे काहीही खाणे सुरक्षित नाही जर आपण वृद्धांसह प्रवास करत आहेत तर खाण्याचे साहित्य जवळ बाळगून प्रवास करा. काही सुकेमेवे,फळे आपल्यासह ठेवा. जेणे करून भूक लागल्यावर त्यांना खायला देता येईल. 
 
6 सोयीस्कर जागा असावी - आपण गाडीने प्रवास करत आहात किंवा ट्रेन,बस,किंवा विमानाने. शक्य असल्यास वृद्धांना सर्वात आरामदायक जागा द्यावी. प्रवासाच्या दरम्यान सामाजिक अंतर राखण्याची काळजी घ्या. खाण्याचे साहित्य इतर प्रवाश्यांसह सामायिक करू नका. सामाजिक अंतर ठेवा.