शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (17:04 IST)

घरी तयार करा बिस्किट केक, अत्यंत सोपी विधी

साहित्य 
1 पॅकेट चॉकलेट बिस्किट, 1 पॅकेट इनो(साधे), 2 चमचे साखर, 1 कप उकळून थंड केलेले दूध
 
कृती 
बिस्कीटचे तुकडे, साखर आणि दूध मिक्सरमधून फिरवून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात 1 चमचा इनो घाला. मिश्रण ढवळून घ्या. केकच्या पात्राला तूप लावून त्यावर जरा गव्हाचे पीठ भुरभुरून घ्या. (याने मिश्रण भांड्याला चिटकत नाही). नंतर हे मिश्रण पात्रात ओता. त्याला टॅप करा. मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटात केक बेक करून घ्या. 
 
आपल्याला ही केक कुकरमध्ये बेक करायची असल्यास कुकर गॅस वर तापवायला ठेवा. झाकणाची शिट्टी आणि रबर काढून घ्या. कुकरमध्ये स्टॅन्ड ठेवून त्यात केक पात्र ठेवून झाकण लावा. गॅस कमी आचेवर 45 मिनिटे ठेवा. नंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर झाकण उघडा. सुरीने केक मध्ये टोचून बघा की मिश्रण बेक झाले वा नाही. बाहेर काढून त्याला प्लेट मध्ये काढा. 
 
टीप:- केकच्या मिश्रणात आपण सुखा मेवा, चेरी, टूटी-फ्रुटी देखील घालू शकतो.