बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

मूगाच्या डाळीचा हलवा

साहित्य : दोन वाट्या साखर, दोन वाट्या मूगाची डाळ, दोन वाट्या दूध, दोन वाट्या तूप, अर्धा चमचा वेलदोडे पावडर, काजू-बेदाणे-पिस्ते. 

कृती : मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर चाळनित उपसा. पाणी पूर्ण गेल्यानंतर मिक्समधून वाटून घ्या. (पाणी न घालता) वेलदोड्याची पूड करून घ्या. काजू उभे चिरून घ्या. बदाम पाण्यात भिजत घालून साल काढून उभे काप करा. कढईत तूप घेऊन त्यावर वाटलेली मूगाची डाळ घालावी व तांबूस होईपर्यंत परतावी. तांबूस झाल्यावर बाजूला ठेवा. दूध साखर एकत्र करून उकळा व डाळीवर ओतून परत गैसवर परता. गॅस मंद ठेवून सारखे परतत राहावे. वेलची पूड घाला व दूध पूर्ण आटल्यानंतर बदाम, काजू घालून खाली उतरवा. हा पौष्टिक पण आहे शिवाय पित्त कमी करतो.