मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (15:47 IST)

शिक्षक दिन 2021 विशेष: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन बद्दल या विशेष गोष्टी जाणून घ्या

भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विद्यार्थ्यांच्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.या दिवशी शाळेतअनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.आयुष्यात गुरुचे स्थान दुसरे कोणी घेऊ शकत नाही. गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतात.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस (5 सप्टेंबर) भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या निमित्ताने आज आम्ही देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत,
 
* डॉ राधाकृष्णन यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.असे मानले जाते की राधाकृष्णच्या वडिलांना त्यांच्या मुलाने इंग्रजी शिकू नये आणि मंदिराचे पुजारी व्हावे अशी इच्छा होती.
 
* राधाकृष्णन यांच्याकडे इतकी प्रतिभा होती की त्यांना प्रथम तिरुपती आणि नंतर वेल्लोर शाळेत पाठवण्यात आले.
 
* डॉ.राधाकृष्णन हे त्यांच्या वडिलांचे दुसरे अपत्य होते.त्यांना चार भाऊ आणि एक लहान बहीण होती, सहा बहिणी-भाऊ आणि दोन पालकांसह आठ सदस्यांच्या या कुटुंबाचे उत्पन्न खूप कमी होते.
 
* सर्वपल्ली राधाकृष्णन,भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.यांना  बालपणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रारंभीचे आयुष्य तिरुतनी आणि तिरुपती सारख्या धार्मिक ठिकाणी व्यतीत झाले.
 
* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, एक महान शिक्षणतज्ज्ञ, एक महान तत्त्वज्ञ, एक महान वक्ता तसेच एक वैज्ञानिक हिंदू विचारवंत होते. राधाकृष्णन यांनी त्यांच्या आयुष्यातील 40 वर्षे शिक्षक म्हणून व्यतीत केली.
 
* भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी शिक्षण आणि राजकारणातील उत्कृष्ट योगदानासाठी महान तत्ववेत्ता,शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक डॉ.राधाकृष्णन यांना देशातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' प्रदान केले.
 
*  डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सामाजिक वाईट गोष्टी दूर करण्यासाठी शिक्षण प्रभावी मानले.
 
* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 1949 ते 1952 पर्यंत यूएसएसआरचे राजदूत होते. आणि 1952 ते 1962 पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते.यानंतर ते 1962 ते 1967 पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते.
 
* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.