शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (15:45 IST)

उशीरा विवाह होण्याच्या समस्येला दूर करण्‍यासाठी खास वास्तु टिप्स

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाह हा महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. परंतु जोडीदार शोधण्याची प्रक्रिया बर्‍याच लोकांसाठी फारच अवघड असते. काहीजणांना उशीरा विवाह होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. उशीरा विवाह होण्याच्या बाबतीत व्यक्ती व कुटुंबावर सामाजिक दबाव असतो तसेच मानसिक व शारीरिक कार्यक्षमता कमी होण्यामुळे घरात परस्पर विरोधाचे वातावरण उत्पन्न होऊ शकते. जे लोक उशीरा विवाह होण्याच्या समस्येचा सामना करीत असतात त्यांच्यासाठी विवाहासाठी वास्तु टिप्स मुळे खूप मदत होते. बर्‍याच वेळा लोक आपल्या पत्रिकेतील दोषांवर आपले लक्ष केंद्रित करतात आणि वास्तु दोषांबद्दल विसरून जातात. चांगला जोडीदार शोधण्यासाठी घरातील वास्तु दोषांना दूर केले पाहिजे.  
 
खाली दिलेल्या वास्तु टिप्स वाचा आणि या टिप्स व्यक्तीला त्याच्या विवाहासाठी कशी मदत करू शकतात हे समजून घ्या –
 
घरात दिवे आणि उदबत्तीमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जेत वाढ होते. रोज दिवे आणि उदबत्ती लावल्याने आंतरिक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते आणि व्यक्तीला आंतरिक शांततेचा अनुभव मिळतो. हे व्यक्तिमत्वाचे विशेष स्वभाव वैशिष्ट्य आहेत जे चुंबकीय गुणधर्माचे आहेत आणि त्यामुळे लोकांना तुमच्याकडे आकृष्ट करता येते.
 
वास्तु अनुसार, वधू किंवा वराने आपल्या तिसर्‍या अनुकूल दिशेचा सामना करून आपल्या भावी वधू किंवा वराच्या समोर बसल्याने सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात. अनुकूल दिशेमुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासाच्या स्तरात वाढ होते.
 
आपल्या अनुरूप जोडीदाराची निवड करताना आपल्या तिसर्‍या अनुकूल दिशेचा सामना करून बसल्याने उशीरा होणारे तुमच्या विवाहाच्या प्रश्नांचे समाधान मिळू शकते.