बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (23:32 IST)

वास्तु दोषावर मात करण्यासाठी काही सोपे उपाय

घर खरेदी करण्यापूर्वी किंवा बांधण्यायपूर्वी वास्तुशास्त्राचे काही नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. वास्तुत काही दोष राहिल्यास आपल्यामागे आयुष्यभरासाठी संकटाची मालिका लागू शकते. जीवनात वारंवार येणार्या  अडचणी प्रगतीला बाधक ठरतात. घरातील सुख-शांती हिरावून घेतात. म्हणूनच घर, दुकान किंवा कार्यालय बांधण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहेत.
 
* घराच्या बैठक खोलीत खरकटी भांडी ठेवल्याने घरातील प्रमुख महिलेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. कुटूंबातील सदस्यांचे आपसात जमत नाही.
 
* बैठकीच्या खोलीत पाण्याने भरलेली वस्तू ठेवू नये.
 
* बैठकीच्या खोलीत ‍वैयक्तिक किंवा मित्रांसोबत व्यसन करणे प्रगतीला बाधा उत्पन्न करू शकते.
 
* घरातील जिन्याखाली बसून कोणतेच चांगले काम करू नका.
 
* घराच्या प्रवेशद्वारसमोर कोणत्याच प्रकारचा अडथळा ठेवू नका.
 
* प्रवेशद्वाराच्या दिशेने पाय करून रात्री झोपू नका. तसे केल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो.
 
* न्यायालयाची फाईल देवघरात ठेवल्याने दावा आपल्या बाजूने लागण्यास मदत होते.
 
* स्वर्गवासी स्वजनांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला लावले पाहिजे. घरातील घड्याळे कधी बंद पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण घरात बंद पडलेली घड्याळी घराची घडी विस्कळीत करतात.
 
* घरातील पलंग कधीच भिंतीला खेटून ठेवू नका. तसे केल्यास पत्नी-पतीमध्ये दरी निर्माण होते.
 
* तीन रस्त्यांवर घर असणे अशुभ असते. अशा घरातील दोष दूर करण्या-साठी घराच्या चारही भिंतीला आरसा लावावा.
 
* घरात एखादा सदस्य नेहमी आजारी पडत असेल तर त्याला घराच्या नैऋत्य कोपर्यायत झोपवले पाहिजे. ईशान्य कोपर्यार पाणी ठेवल्याने अधिक लाभ होतो.
 
* घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याच्या पायाची नाल, दुर्गा यंत्र, त्रिशक्ति, आत बाहेर श्री गणपतीची प्रतिमा तसेच दक्षिणमुखी द्वार असेल तर हनुमानाची प्रतिमा किंवा भैरव यंत्र लावल्याने घरातील दोष दूर होतात.
 
* औषधे नेहमी ईशान्य कोपर्या्त ठेवली पाहिजे. औषधे घेतानाही तोंड ईशान्य दिशेनेच पाहिजे. असे केल्याने औषधांचा प्रभाव तत्काळ जाणवतो.