मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (11:40 IST)

घरात बनवा चविष्ट दही सँडविच

curd sandwich recipe
संध्याकाळच्या चहासोबत काही तरी हलकं खायला लागत. बऱ्याच वेळा इच्छा होते काही तरी चविष्ट आणि चटपटीत खाण्याची जे संध्याकाळच्या हलक्या भुकेला देखील दूर करेल. या साठी आम्ही घेऊन आलो आहोत दही सँडविच जे बनवायला सोपे आहे आणि तळकट आणि मसालेदार खाण्यापासून दूर राहणाऱ्यांना देखील हे नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
 
साहित्य- 
4 ब्रेड पीस, 1/4 कप दही, 2 मोठे कांदे चिरलेले, 2 मोठे टोमॅटो चिरलेले, कोबी थोडी चिरलेली, गाजर बारीक चिरलेली, 1 ढोबळी मिरची चिरलेली, 1 काकडी चिरलेली, 1/4 चमचा काळी मिरपूड, 1 चमचा पिठीसाखर, मीठ चवीपुरती.
 
कृती -
एक भांड्यात दही फेणून सर्व जिन्नस मिसळा. त्यामध्ये चिरलेल्या भाज्या, कोबी, ढोबळी मिर्च, गाजर, इत्यादी मिसळून काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कापून घ्या. ब्रेडला त्रिकोणात कापून त्यामध्ये तयार केलेले सारण भरून दुसऱ्या स्लाइसने कव्हर करा. तव्यावर सोनेरी रंग येई पर्यंत दोन्ही कडून शेकून घ्या आणि टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरचीच्या चटणी सह सर्व्ह करा.