बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (20:32 IST)

उरलेल्या वरणाचे चविष्ट धिरडे

बऱ्याच वेळा जेवणात जास्तीचे वरण शिल्लक राहते, परत तेच वरणं खायला कंटाळा येतो आणि चव देखील चांगली लागत नाही. आज शिल्लक उरलेल्या वरणाचे चिले  किंवा धिरडे कसे बनवायचे ही सोपी कृती सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
 
साहित्य- 
उरलेले वरण गरजेप्रमाणे, 1/2 कप गव्हाचं पीठ,1/2 कप तांदुळाचे पीठ, 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली,हळद,हिंग,कोथिंबीर,तेल   
 
कृती-
एका भांड्यात अर्धा चमचा तेल आणि सर्व जिन्नस वरण,तांदुळाचा पीठ, गव्हाचं पीठ, हळद, मीठ,हिंग, लसूण, कोथिंबीर,हिरवी मिरची घालून मिसळा.  लागत लागत पाणी घालत डोस्याच्या घोळा प्रमाणे घोळ तयार करा. 
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा आणि त्यावर थोडंसं तेल लावा. एका वाटीच्या साहाय्याने घोळ तव्यावर पसरवून द्या. लागत लागत तेल सोडा आणि दोन्ही बाजूने धिरडं सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या. गरम धिरडे नारळाच्या चटणीसह किंवा सॉस सह सर्व्ह करा.