शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (21:25 IST)

पालकाचे पौष्टिक सूप

पालकाचे सूप पौष्टिक आणि चटकन बनणार पदार्थ आहे . घरी पालकाचे सूप बनविणे खूप सोपे आहे. कारण हे बनविण्यासाठी काही मोजकेच साहित्य लागते. चटकन बनणारे हे सूप खूप पौष्टीकआहे चव वाढविण्यासाठी या मध्ये ताजे क्रीम घालू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य-
2 कप पालक, 1/2 कप दूध,1/2 कॉर्न फ्लोर,1/2 चमचा तेल,1/3 कप चिरलेला कांदा, 1/4 इंच आल्याच्या तुकडा,लसणाच्या 1 -2 पाकळ्या , 1  
 कप पाणी, 1/4 चमचा साखर इच्छा असल्यास, मीठ चवी प्रमाणे, 1/4 काळी मिरपूड, 
 
कृती -
पालकाची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. पाने मोठी असल्यास जाड तुकडे करा. दुधात कोर्नफ्लोर मिसळा आणि ढवळा या मध्ये गाठी पडू देऊ नका.
कढईमध्ये तेल घालून गरम करा आणि कांदा लसूण गुलाबी होई पर्यंत परतून घ्या. या मध्ये धुतलेले पालक घाला आणि मऊ होईपर्यंत शिजवा. या मध्ये पाणी, साखर आणि मीठ घालून मिसळा आणि उकळवून घ्या. साखरेमुळे पालक चा रंग हिरवा राहतो. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये हे वाटून घ्या.आता ही पालकाची प्युरी पॅन मध्ये काढून घ्या. चमच्याने सतत ढवळत राहा यामध्ये दुधात घोळलेले कोर्नफ्लोर घाला. 1  ते 2 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. काळी मिरपूड घाला. मिश्रण 5 मिनिटे शिजवा चवी प्रमाणे काळीमिरपूड किंवा मीठ अजून घाला.एका वाडग्यात काढून घ्या आणि ब्रेड क्रूटन्स घालून गरम सर्व्ह करा.