रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (19:05 IST)

कांदा पराठा रेसिपी

न्याहारीसाठी साधें पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर कांद्याचे चविष्ट पराठे बनवा. बनवायला सोपे आणि चवदार असणारे हे कांद्याचे पराठे नक्की बनवून बघा. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
 
1 कप गव्हाचे पीठ, 3/4  कप बारीक चिरलेला कांदा, 1/4 चमचे जिरे, 2 हिरव्या  मिरच्या, गरम मसाला पूड, धणेपूड, कोथिंबीर, तेल, मीठ   
 
कृती -
 
मध्यम आचेवर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात जिरे घाला बारीक चिरलेला कांदा घाला गुलाबी रंग येई पर्यंत परतून घ्या.बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर चिरलेली , गरम मसाला,धणेपूड,घालून मिसळा.गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.  
एका भांड्यात गव्हाचं पीठ 2 चमचे तेल शिजवलेल्या कांद्याचे मिश्रण आणि मीठ घालून लागत लागत पाणी घालून कणीक मळून घ्या.पिठाला तेल लावून झाकून ठेवा.आता या कणकेचे गोळे करा आणि पोळीसारखे लाटून घ्या. गॅस वर तवा तापत ठेवा आणि त्या वर लाटलेला पराठा ठेवा पराठ्यावर बुडबुडे आल्यास पालटून द्या. तेल सोडा आणि दोन्ही बाजूने शेकून घ्या खमंग कांदा पराठा दह्यासह सर्व्ह करा.