मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:01 IST)

Less Oil Snacks Recipe मुगाचे चविष्ट आणि पौष्टिक कबाब

संध्याकाळच्या न्याहारीत काही चविष्ट आणि कमी तेलात खाण्याची इच्छा होते. कारण तळकट आणि भाजक आरोग्यास हानिकारक असते. अशा परिस्थितीत मुगाचे पौष्टिक कबाब आरोग्याची काळजी घेतील आणि चव बदलतील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
मुगडाळ, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आलं,तिखट हिंग, गरम मसाला,मीठ चवीप्रमाणे, तेल तळण्यासाठी. 
 
कृती -
कबाब बनविण्यासाठी मुगडाळ धुऊन घ्या. कुकरमध्ये घालून कांदा,आलं  हिरव्या मिरच्या, हिंग,गरम मसाला,मीठ घाला. डाळ पाण्यात बुडे पर्यंत पाणी घालून कुकर मध्ये पाच ते सहा शिट्ट्या द्या. डाळ शिजल्यावर काढून घ्या. आता एका कढईत थोडंसं तेल घालून गरम करा त्यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ घालून परतून घ्या.डाळ सोनेरी रंगाची झाल्यावर गॅस वरून काढून ताटलीत ठेवा आणि थंड होऊ द्या. या डाळीला थोडं थोडं हातावर घेऊन टिक्कीचा आकार द्या. एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालून या मुगाच्या टिक्कीला मंद आचेवर सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. मुगाचे चविष्ट कबाब खाण्यासाठी तयार आहे.हे कबाब चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.