शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (18:16 IST)

अंकुरलेल्या धान्यापासून तयार आरोग्यवर्धक चविष्ट अप्पे

न्याहारी साठी असे काही व्यंजन बनवतात हे चविष्ट असण्यासह आरोग्यवर्धक असावे. अशा मध्ये अंकुरलेल्या धान्यापासून बनलेले अप्पे हे खाण्याची चव वाढवतील आणि आरोग्यासाठी देखील पौष्टीक आहे.  
चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
दीड कप अंकुरलेले मिश्र धान्य (मोठ,चणा,सोयाबीन,शेंगदाणे इत्यादी )किंवा 1 धान्य, 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर,1/2 चमचा हिरवी मिरची पेस्ट,1/4 चमचा जिरे,1/4 चमचा हिंग,मीठ चवीप्रमाणे,तेल, कांदा पुदिना चटणी (सर्व्ह करण्यासाठी). 
 
कृती-
अंकुरलेले धान्य आणि 1/2 कप पाणी मिक्सर मध्ये मऊ होईपर्यंत वाटून घ्या.या मिश्रणात इतर जिन्नस मिसळा आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्या.
आता अप्पे पात्राला तेल लावून त्या साच्यात हे मिश्रण घाला.वरून तेल सोडा आणि दोन्ही कडून तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या. अशा प्रकारे बाकी घोळ देखील साच्यात घालून अप्पे तयार करा.
गरम अप्पे कांदा आणि पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह करा.