काही सोप्या किचन टिप्स
* दूध गरम करताना त्यामध्ये एक चमचा घालून ठेवा. या मुळे दूध उतू जाणार नाही.
* स्वयंपाकघरात काही चिकट झाले असल्यास त्यावर ब्लीच घालून द्या आणि त्याला ब्रशने स्वच्छ करा. चिकटपणा स्वच्छ होईल.
* फ्रीज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा. या मुळे फ्रीज सहजपणे स्वच्छ होईल.
* फरशी चमकविण्यासाठी एक कप व्हिनेगर मध्ये गरम पाणी घालून फरशी स्वच्छ करा.ही स्वच्छ होईल.
* घरात झुरळ जास्त झाले असल्यास स्वयंपाकघरात कोपऱ्यात बोरिक पावडर घालून ठेवा या मुळे झुरळ त्रास देणार नाही.
* घरात मुंग्या जास्त झाल्या असल्यास ट्यूबलाईट किंवा बल्बच्या जवळ कांदे लोंबकळतं ठेवा या मुळे मुंग्या नाहीश्या होतात.
* हिरव्या पाले भाज्या नेहमी धुतल्यावरच चिरायला घ्या असं केल्यानं त्या मधील पोषक घटक तसेच राहतात.
* सॅलड नेहमी सर्व्ह करताना घाला कारण मीठ पाणी सोडत.
* घरातून पाली काढण्यासाठी ट्यूबलाईट वर अंड्याची टरफल लोंबकळतं ठेवा.
* बर्फ जमवताना क्रिस्टल बर्फ बनविण्या साठी पाणी उकळवून थंड करून त्याने बर्फ बनवा.