स्त्री जागृति
सौ. स्वाती दांडेकर
रात्र सरली झाली पहाटआला सूर्य नभांगणीटिमटिमते तारे हरवले रात्रीचेचंद्र लोपला नभांतरीसूर्याची लालीमा स्वागत करते नव दिसवांचेपसरूनी किरणांची फुलझडी।।1।।पक्षाची किलबिल सुरू झालीगाय वासरे हंबरतीमंदीराची घंटा निनाद करतीवृद्ध जनांची मंत्र जागृति ।।2।।स्वरूप जन जीवन सामान्याचेरोज सुरू होते रोज संपतेयुगांन युगा पासून हीच पद्धती ।।3।।मी जागृत करते स्त्री सखी तुजला संपव निद्रा सुप्तावस्थेचीकर झंकृत तार आपुल्या बुद्धिमत्तेचेनिनादून दे ही वसुंधरा सारी ।।4।।
दे जाणीव आपुल्या शक्तिचीकर सामना ह्या जगाचाकशास घाबरते सर्वांशीतू तर वंशज राणी लक्ष्मीची ।।5।।तोडुन टाक बंधने सारीजे देतात कष्ट तुजलातोडुन टाक जाळे अपशब्दांचेजे सोसले तु नि:शब्द पणे ।।6।।ये कोंदणीच्या जीवनातुन बाहेर तूनिश्चल, निर्मल जगात स्वागत तुझेपुसुन टाक वेदना तन मनाच्याज्या कोरल्या अंत:करणीघे हाती शस्त्र शिक्षणाचेदेईल आवरण हे तुजला आत्मरक्षेचे ।।7।।ठेव विश्वास मनी तुझ्यासंपली रात्र तुझ्या यातनेचीउमेदीचा उष:काळ झाला नभीप्रगतीचा पथ लाभो तुजला आशा किरणांची हिरवउ रे ।।8।।यश कीर्तीचा सूर्य चमकोतुझ्या भाग्य नभीहेच मागते देवा पाशीठेव कीर्ति कायम आमचीकारण मी पण तुझी सखी सोबती ।।9।।