शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 23 जानेवारी 2023 (15:35 IST)

धक्कादायक! मुंबईत 20 महिन्यांचा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

rape
मुंबईतून 20 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आली आहे. सदर घटना मूंबईतील वरळी भागातील असून या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसर हादरले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या परिसरात आरोपी आणि पीडित चिमुकलीचे कुटुंब राहतात. मुलीला घरात एकटी सोडून तिची आई कामानिमित्ते बाहेर गेली होती. घरात चिमुकली एकटी पाहून आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यावर मुलगी जोरात रडत होती. तिचे रडणे ऐकून आईला संशय आला आणि तिने तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे मुलीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात पोलीस तक्रार केली. या घटनेमुळे परिसर हादरले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
Edited By- Priya Dixit