शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:04 IST)

3 मुलींची धावत्या ट्रेन मधून उडी,व्हिडीओ व्हायरल !

देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतून धक्कादायक घटनेचे व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये तीन मुलींनी चालत्या लोकल मधून उडी घेण्याचे व्हिडीओ समोर आले आहे. कधी कधी घाई संकटात नेते. हे आज सिद्ध झाले. मुंबईच्या धावत्या जीवनात केलेली घाई मुळे मुलींचा जीव धोक्यात आला. ही  संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की ,तीन मुलींनी धावत्या लोकल मधून उडी घेतली.त्यातील पहिल्या मुलींनी चालत्या लोकल मधून उडी घेतली तर ती ट्रेन खाली येता वाचली सुदैवाने गार्डने काहीच सेकंदात तिला वाचवले. ती मुलगी  प्लॅटफॉर्मच्या काठावरच पडली. तिला पडलेलं पाहून लगेच गार्डने तिला ट्रेनच्या खाली जाण्यापासून रोखले. त्या पाठोपाठ दोघीनी आणखी चालत्या लोकल मधून उडी घेतली. सुदैवाने त्या तिघींचा जीव वाचला. त्या गार्डने प्रसंगावधान राखुन मुलीचा जीव वाचविला.
 
मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी रेल्वे पोलीस जवान अल्ताफ शेख यांचे मुलीचे जीव वाचविल्याबद्दल आणि त्यांच्या सतर्कते बद्दल सत्कार केले.

मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्तांनी या घटनेत प्रसंगावधान राखून मुलीचा जीव वाचविण्याच्या गार्डला पुरस्कृत केल्याचे ट्विट केले आहे.