शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (12:16 IST)

80 वर्षांच्या नराधमाने दोन अल्पवयीन बहिणीवर केले अत्याचार

मुंबईत घडलेल्या एका संतापजनक घटनेत एका 80 वर्षाच्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या शेजारीच राहणार्‍या दोन अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
मीडिया वृत्तानुसार, ही घटना मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील घडली असून आरोपी हा पीडित कुटुंबीयाच्या शेजारी राहत होता. लॉकडाउनच्या काळात माणुसकीच्या नात्याने पीडित कुटुंबाने या आरोपीला खाण्या-पिण्याची व्यवस्था केली होती. लॉकडाउन लागू होण्याच्या आधीच त्याचे कुटुंब गावीकडे निघून गेले होते मात्र याला गावी जाता आले नाही. हा आरोपी मुळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. 
 
लॉकडाऊनच्या काळात घरात एकटाच राहत असल्यामुळे आणि वयोवृद्ध असल्याचा विचार करून शेजारी राहणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाने त्याला वेळोवेळी मदत केली. पीडित कुटुंबीयाच्या एकूण सहा मुलींपैकी दोन अल्पवयीन मुली आरोपीला खाण्या-पिण्याचं सामान द्याला जात होत्या. त्यापैकी एक 12 वर्ष आणि दुसरी मुलगी 7 वर्षाची होती. 
 
हा सगळा प्रकार शेजारीच राहणार्‍या दुसर्‍या व्यक्तीने बघितल्यावर आरडाओरड करुन पीडित कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली. नंतर पीडित मुलींच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.