रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2024 (11:17 IST)

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

crime
मुंबई मध्ये चित्रपट 'स्पेशल 26' सारखी घटना समोर आली आहे. इथे सहा बदमाषांनी स्वतःला क्राईम ब्रांच असल्याचे सांगून एका प्रसिद्ध कॅफे मालकाचे घर लुटले आहे. पिडीताला संशय आल्यावर त्याने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
 
मुंबईमध्ये सहा बदमाश ज्यांनी स्वतःला क्राईम ब्रांचचे अधिकारी सांगून एका प्रसिद्ध कॅफे मालकीच्या घरात चक्क 25 लाखांवर हात साफ केला आहे. एका  अधिकारींनी गुरुवारी माहिती दिली की, पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
 
मुंबई शहरातील माटुंगा परिसरात एक प्रसिद्ध कॅफे चालवणार व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सहा लोक त्याच्या सायन रुग्णालयाजवळील घरी आले व त्यांनी सांगितले की ते क्राईम ब्रांचचे अधिकारी आहे. तसेच ते म्हणाले की आम्ही निवडणूक ड्युटीवर आहोत. माहिती मिळाली आहे की, तुमच्या घरात लोकसभा निवडणुकी बद्दल पैसे ठेवले आहे. तसेच कॅफे मालकाने सांगितले की माझ्याजवळ फूड बिझनेसचे फक्त 25 लाख रुपये आहे आणि या पैशांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. यानंतर त्या आरोपींची ते 25 लाख रुपये मागितले व कॅफे मालकांना धमकी दिली. 
 
यानंतर कॅफे मालकाने पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. पोलिसांनी केस नोंदवून घेतली आणि तपास सुरु केला. त्या सहा आरोपींमधून चार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना यश आले. पोलिसांचे म्हणणे आहे की, क्राईममध्ये एक रिटायर्ड पोलीस शिपाई आणि परिवहन विभागाचे करमर्चारी सहभागी असल्याचा संशय आहे.