1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (13:51 IST)

मुंबईत सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई होणार

सुमारे दोन महिन्यांपासून लॉकडाउन असणाऱ्या मुंबई, ठाण्यासह राज्याच्या बहुतांश भागांतील नागरिकांना आजपासून दिलासा मिळाला आहे. इतर जिल्हयांसह मुंबईत देखील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत ठराविक वेळेपर्यंत दुकान खुली ठेवण्यास परवानगी आहे. तसेच यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. तरी त्यांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. AC सुरु ठेवल्यास कारवाई होणार असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
 
पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांना परवानगी देण्यात आली असून ४ वाजेपर्यंत सुरु असतील. मात्र त्यांना एसी सुरु ठेवण्यास परवानगी नाही. जर एसी सुरु असला तर कारवाई करण्यात येईल कारण एसीच्या माध्यमातून विषाणूंचा फैलाव होण्याची शक्यता असते,”
 
मुंबई
* जीवनाश्यक सेवेतील दुकाने 7 ते 4 वाजेपर्यंत, इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 4 वाजेपर्यंत, अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद
* हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा. शनिवार आणि रविवार बंद
* सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरु
* खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती
* चित्रपट शूटिंगला स्टुडिओमध्ये परवानगी
* सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी. शनिवार आणि रविवार बंद
* लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती
* अंत्यसंस्कारासाठी 20 जणांची उपस्थिती
* इतर बैठका 50 टक्के उपस्थिती
* कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी
* दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम
* मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
* इनडोअर स्पोर्ट्स बंद राहतील
* मुंबईत रात्री 8 वाजेनंतर नंतर जमावबंदी आणि संचारबंदी एकत्रित सुरु राहील असंही यावेळी त्यांनी सांगितलं.