मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहाला सावरकरांचे नाव
मुंबई विद्यापिठाच्या मुलांच्या विद्यार्थी वसतीगृहाला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सुचनेनंतर वसतीगृहाला सावरकरांच्या नाव देण्याचे निश्चित झाले. काही दिवसापूर्वी विद्यार्थी छात्र भारती या विद्यार्थी संघटनेने वसतीगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे यासाठी अंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.
मुंबई विद्यापिठाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या नूतन इमारतीचे नुकतेच लोकार्पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी वसतीगृहाला विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी ईच्छा व्यक्त केली होती. याला विरोध करताना विद्यार्थी छात्र भारती संघटनेने राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा आग्रह धरला होता. शेवटी सावरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.