मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (08:07 IST)

शरद पवारांच्या तोंडातील ‘अल्सर’ काढला; प्रकृती उत्तम...

“पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता, त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला असून तो काढण्यात आला आहे.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच, “शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा देखील घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील.” असा देखील विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
 
या अगोदर शऱद पवार यांना २१ एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. २१ दिवसांतील ही तिसरी शस्त्रक्रिया होती. त्या अगोदर ३० मार्चला पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. १२ एप्रिलला पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ते पुन्हा ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले होते.