अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल
अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तिच्यावर राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीचा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अभिनेत्री केतकी ही सोशल मीडियावर एक्टीव्ह असून आपले बिनधास्त वक्तव्य आणि विचार मांडत असल्यामुळे बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकते. आता फेसबुक वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवरून ती पोस्ट करणे केतकीला महागात पडले आहे. तिने आपल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली असून ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. तिने केलेल्या या पोस्टवरून राष्ट्रवादी कांग्रेसच्या पक्षाकडून नाराजगी व्यक्त केली आहे. तिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आता ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.