मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (01:19 IST)

मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला, 6149 नवे रुग्ण आले, सात जणांचा मृत्यू

COVID
सलग पाच दिवस रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर मंगळवारी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली. मंगळवारी मुंबईत 6 हजार 149 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. या दरम्यान 12 हजार 810 लोक बरे झाले आहेत.
 
आदल्या दिवशीच्या तुलनेत मंगळवारी आणखी 193 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तथापि या कालावधीत मृत्यूचे प्रमाण 5 ने कमी झाले. ताज्या गणनेनुसार आता मुंबईतील कोविड-19 ची संख्या 10 लाख 11 हजार 967 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 16 हजार 476 वर पोहोचली आहे.
 
आरोग्य विभागा प्रमाणे महाराष्ट्रात मंगळवारी 39 हजार 207 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली जी सोमवारच्या तुलनेत 26 टक्क्यांनी जास्त आहे. यादरम्यान 53 रुग्णांचाही मृत्यू झाला.