रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (16:19 IST)

मुंबईत न्यायालयीन अधिकाऱ्याला व्यावसायिकाकडून 25 लाखांची लाच घेताना अटक

Bribe
मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाकडून 25 लाख रुपयांची लाच घेताना एका न्यायालयीन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. 

मुंबईत एका हॉटेल व्यावसायिकाकडून एका न्यायालयीन अधिकाऱ्याने 25 लाख रुपयांची लाच मागितली लाचलुपत प्रतिबंधक ब्युरोने सोमवारी एलटी मार्गावरील एका हॉटेल मध्ये सापळा रचून अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपी अधिकाऱ्याने हॉटेल मालकीचा प्रलंबित प्रश्न आपल्या बाजूने सोडवण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. मला पैसे द्या मी तुमचे काम करतो असे अधिकाऱ्याने म्हटले.

हॉटेल व्यवसायिकाने अधिकाऱ्याची तक्रार केल्यावर लाचलुपत प्रतिबंधक ब्युरोच्या पथकाने हॉटेल मध्ये सापळा रचून अधिकाऱ्याला रंगे हाथ पकडले.आरोपी अधिकाऱ्याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा संबंधित कलमांतर्गत अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit