शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (15:09 IST)

मुंबईच्या धारावीमध्ये सिलेंडरचा स्फोट, 14 जण जखमी

महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या धारावी परिसरात एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे.
 
वृत्तानुसार,अपघात दुपारी 12.30 च्या सुमारास झाला. सिलेंडर फुटल्याची ही घटना धारावीच्या साहू नगरमध्ये घडली आहे. या अपघातात 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
 
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम केले. सिलिंडर कसा फुटला हे अद्याप समजू शकलेले नाही. सर्व जखमींना सीऑन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.