गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (08:04 IST)

मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, दीड वर्षात कोरोना रुग्णसंख्येचा निचांक

मुंबईत कोरोनाच्या  दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. बुधवारी 108 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या दीड वर्षात कोरोना रुग्णसंख्येचा हा निचांक आहे. याआधी 16 एप्रिल 2022 रोजी 107 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 215 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचला आहे. 
 
मुंबईत शुक्रवारी 230, शनिवारी 214, रविवारी 217, सोमावरी 115 तर मंगळावारी 187 रुग्ण आढळले होते.  मुंबईत बरं झालेल्या रुग्णांची संख्या आता 7 लाख 42 हजार 176 इतकी झाली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2780 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या दोन हजाराहून कमी सक्रीय रुग्ण संख्या आहे. मुंबई सध्या कोरोनाचे 1904 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.