गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (16:27 IST)

मुंबईत ट्रॉली बॅगमध्ये 60 कोटींचे ड्रग्ज जप्त, महिलेला अटक

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या तपासणीत एका महिलेकडून 60 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ही महिला झिम्बाब्वेची रहिवासी आहे . मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा मिळाल्यानंतर तिला  अटक करण्यात आली आहे. ही महिला 12 फेब्रुवारीला झिम्बाब्वेहून मुंबई विमानतळावर आली होती. तिची झडती घेतल्यावर तिच्या कडून 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
 
झिम्बाब्वेच्या महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 60 कोटी रुपये आहे. महिलेने हे ड्रग्ज तिच्या ट्रॉली बॅगमध्ये आणि फाइल फोल्डरमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे कस्टम विभागाचे म्हणणे आहे.