मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (21:13 IST)

म्हणून राणीची बाग 'या' सुट्टीच्या दिवशीही खुले राहणार

ranicha bagh
मुंबईत येणारे देशी- विदेशी पर्यटक, मुंबईकर पर्यटक हे भायखळा येथील राणीच्या बागेत आवर्जून भेट देतात व जंगल सफारीचा आनंद लुटतात. मात्र आठवड्याभरातील सात दिवसांपैकी सहा दिवस पर्यटक राणीच्या बागेत भेट देऊन पक्षी, प्राणी यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. मात्र या सहा दिवसात पक्षी व प्राणी यांचा सतत संपर्क होत असल्याने आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे पक्षी व प्राणी यांना आठवड्यातील एक दिवस तरी विश्रांती देणे आवश्यक असते. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने राणीची बाग आठवड्यातून एकदा म्हणजे दर बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मात्र महापालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले ठेवण्यात येते. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी ‘श्रीगणेश चतुर्थी’ निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. जेणेकरुन या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल.