सोमवार, 16 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (17:46 IST)

मुंबईत घटस्फोट मागणाऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने एसिड ओतले

Acid attack
पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर एसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
मुंबईतील मालवणी भागात ही घटना घडली.27 वर्षीय महिलेने तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे कारण देत घटस्फोट मागितला. महिलेला तिचा नवरा अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचेही समोर आले. यानंतर त्याने घटस्फोट मागितला. महिलेचा पती बेरोजगार असून दोघांनी प्रेमविवाह केला आहे.
 
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर ही पीडित महिला गेल्या 3 महिन्यांपासून तिच्या आईसोबत राहत होती.दरम्यान, काल सकाळी 34 वर्षीय आरोपीने येथे येऊन ॲसिड ओतले. महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेच्या पतीच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 124 (2), 311, 333, आणि कलम 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे
Edited by - Priya Dixit