वसईत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा मोठा स्फोट, सात वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू
इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.रोज कुठल्या ना कुठून भागातून इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या बातम्या समोर येतात.आता हीं घटना महाराष्ट्रातील पालघरच्या वसई येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे, जिथे वसईत इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट होऊन त्यात सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. शब्बीर शाहनवाज असे या चिमुकल्याचे नाव आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणाले की, अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर आजीसोबत झोपला होता. मुलाचे वडील सर्फराज अन्सारी यांनी रात्री अडीच वाजेच्या सुमारास बॅटरी चार्ज करून ठेवली आणि ते आपल्या खोलीत झोपायला गेले. पहाटे 5.30 च्या सुमारास स्फोटानंतर शॉर्ट सर्किट झाल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. सर्फराज अन्सारी आणि त्यांच्या पत्नीने खोलीत जाऊन पाहिले असता मुलाच्या आजीला किरकोळ दुखापत झाली होती, मात्र शब्बीर गंभीर जखमी झाला होता.
त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता 2ऑक्टोबर रोजी शब्बीरचा दुर्देवी मृत्यू झाला. स्फोटामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि घराचे मोठे नुकसान झाले. घरातील उपकरणे आणि तत्सम अनेक वस्तूंचीही नासधूस झाली. स्कूटर घराबाहेर उभी होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा आढावा घेतला. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सांगितले की, अतिउष्णतेमुळे स्फोट होण्याची शक्यता आहे. जयपूरच्या स्कूटर निर्मात्याला बॅटरीची चाचणी घेण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुमारे तीन ते चार तास बॅटरी चार्ज करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले जाते. . रात्रीच्या वेळी रहिवाशांनी बॅटरी आणि मोबाईल चार्ज करू नये,असे आवाहन पोलिसांनी केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी उघड्यावरच चार्ज कराव्यात आणि चार्जिंग करताना काळजी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले.
Edited By - Priya Dixit