बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:16 IST)

आता आशिष शेलारांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? : पेडणेकर

“मुंबईतील पेंग्विनवरून आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणतायत… मग आता आशिष शेलारांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? भातखळकरांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी केली आहे. गुजरात दौऱ्यावरून परतल्यानंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेतली. 
 
“मुक्या प्राणी, पक्ष्यांवरून राजकारण करुन मुंबईला बदनाम करायचे, मुंबईला अस्थिर करतायत. मुंबईला बदनाम करतायत… महाराष्ट्राला बदनाम करतायत… सतत आरोपांवर आरोप करतायत… सिद्ध तर एकही करत नाही.” असा आरोपही महापौरांनी केला आहे.
 
“मी अहमदाबादला गेल्यावर सगळ्यांना उलट्या सुरु झाल्या. मी तुलना केली नव्हती, पण त्याआधीच विरोधकांना उलट्या सुरु झाल्या. मी गुपचूप नाही थेट संपर्क करुन गेले. तिथे माझे आदरातिथ्य उत्कृष्ट झाले. जिलेबी फाफडा और किशोरी बेन आपडा असं ते प्रेमाने म्हणाले.” अशी खोचकं टीकाही महापौरांनी केली आहे.
 
मुंबई आणि गुजरामधील गुजराती बांधवांचे आभार,आम्ही देखील पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो असा अनुभव आला. ज्या पक्षी, प्राण्यांवर न बोलण्याच ठरवले होते त्यावरून भातखळकर, शेलार, राणे सुपुत्र पेंग्विन वरून टीका करत आहेत.मुंबईत सर्वप्रथम 2016 मध्ये आदित्य ठाकरे यांनीच पेंग्विन आणयला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणतायत… मग आता आशिष शेलारांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? भातखळकरांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना चांगल म्हणूया, राजकारण कशासाठी करताय. असा शब्दात महापौरांनी खडसावले आहे.