रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (14:48 IST)

शंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शंभर टक्के मुंबईकरांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य महापालिकेने गाठले आहे. शनिवारी दुपारीपर्यंत एकूण ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिला डोस घेतल्याची नोंद ‘कोविन’ ॲपवर झाली आहे.
 
तर ५९ लाख ८३ हजार ४५२ नागरिकांंनी दोन्ही डोस घेतलेे आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये मुंबईबाहेरील नागरिकांचाही समावेश आहे.मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १८ वर्षांवरील एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० लाभार्थी आहेत.
 
या लसीकरण मोहिमेत पालिका आणि सरकारी केंद्रांबरोबरच खाजगी रुग्णालयांना मोठे योगदान दिले. या कामगिरीमुळे मुंबईने देशातील दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरूसह सर्व महानगपालिकांमध्ये सर्वोत्तम ठरण्याचा मान पटकावला आहे.