1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (20:05 IST)

अंधेरी परिसरातून पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड

maharashtra police
मुंबईतील अंधेरी परिसरातून पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. घटनास्थळावरून ९ तरुणींची सुटका केली आहे. तसेच स्पा मॅनेजरला अटक केली आहे. तर स्पाचा मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी केली जात आहे. या प्रकरणामध्ये अनेक बड्या धेंडांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
 
पोलिसांनी सांगितले की, स्पा सेंटरवर टाकलेल्या धाडीमधून मणिपूरमधील ४, मिझोरममधील दोन आणि मेघालय, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरचा मॅनेजर चंद्रकांत उर्फ बंटी याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं आहे. तर स्पाचा मालक अतुल धिवर हा फरार आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पा सेंटरच्या आडून सेक्स रॅकेट चालत होते, असे पोलिसांनी सांगितले.या बाबद दैनिक लोकमत ने वृत्त दिले आहे.