मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (23:25 IST)

खळबळजनक, वसईच्या भुईगाव समुद्रात एक संशयास्पद बोट

वसईच्या भुईगाव समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे. . पोलीस आणि तटरक्षक दलामार्फत बोटीची पाहणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे.
 
वसईजवळील भुईगाव समुद्रकिनार्‍यावर  एक संशयास्पद बोट स्थानिकांना दिसली. या भागात बोटींचा वावर नसल्याने ही अनोळखी बोट कशी आली? याचा स्थानिक मच्छिमारांना संशय आला. ही बोट समुद्र किनार्‍यापासून दोन नॉटीकल मैल आतमध्ये आहे. बोटीवर कसलाच झेंडा किंवा निशाण नसल्याने संशयाला 
बळकटी मिळाली. याबाबत वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. 
 
 पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या मदतीने बोटीवरील तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र बोटीत कुणी आढळून आले नाही. त्यामुळे तटरक्षक दल आणि महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाच्या (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) ची मदत घेण्यात आली आहे. ही बोट संशयास्पद असून ड्रोनच्या मदतीने हवाई पाहणी केली परंतु अद्याप बोटीबद्दल माहिती मिळालेली नाही. दरम्यान, बोटीबाबत संदिग्धता असल्याने खबरदारी म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क कऱण्यात आले आहे.