सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (15:27 IST)

मुंबईतले प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

death
मुंबई : मुंबईतले प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा येथे राहत्या घरी पोरवाल यांनी २३ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचे रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आज आत्महत्या केली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited by: Ratnadeep Ranshoor