दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट मुंबईकरांना दिलासा
दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. सोमवारी मुंबईत एकूण ३५६ नव्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत ०५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत आज ९४९ करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी निदान झालेल्या एकूण ३५६ रुग्णांपैकी ४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याकारणाने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील एकूण बाधितांपैकी आतापर्यंत एकूण १० लाख २७ हजार ०९३ रुग्ण बरे झाले आहेत. या बरोबरच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आहे ९८ टक्के. तर मुंबईत एकूण ५ हजार १३९ रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ७६० दिवसांचा आहे. तर मुंबईत ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णवाढ ०.०९ टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मुंबईतील स्थिती
२४ तासात बाधित रुग्ण- ३५६
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ९४९
बरे झालेले एकूण रुग्ण- १०२७०९३
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%
एकूण सक्रिय रुग्ण- ५१३९
दुप्पटीचा दर- ७६० दिवस
कोविड वाढीचा दर (२९ जानेवारी- ०४ फेब्रुवारी)-०.१०%