लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेल्या नियमित मेल-एक्सप्रेस गाड्या आणि लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतलेला आहे. त्यामुळे सामान्यांसाठी लोकल वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना सध्या फक्स्टत बेस्ट, एसटी बस आणि खासगी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे.