गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 16 जून 2022 (17:19 IST)

उंदराने शोधले 10 तोळे सोने

rat
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणारी सुंदरी नावाची महिलेला आपल्या मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडायचं होतं. त्यासाठी घरातील दहा तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवायचे होते. सुंदरी या घरकाम करतात आणि ती कामाला गेली होती. तिकडे त्यांच्या मालकांनी तिला सुकापाव खायला दिला. तिने तो पाव नकळत सोन्याच्या पिशवीत ठेवला आणि पुढे बँकेत जाण्यासाठी निघाली. वाटेत सुंदरीला एक भिकारी स्त्री आणि तिचे मूल दिसलं. सुंदरीने पिशवीत ठेवलेला पाव मुलाला दिला आणि निघून गेली. सुंदरी बँकेत पोहोचली तेव्हा तिला समजलं की तिने मुलाला दिलेली पावाच्या पिशवीत सोन्याचे दागिनेही ठेवले होते. सुंदरी लगेच बँकेतून निघाली आणि भिकारी स्त्री ज्याठिकाणी भेटली होती तिथे गेली. पण सुंदरी यांना ती स्त्री सापडली नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ दिंडोशी  पोलिसांत याबाबत तक्रार दिली. 
 
खरं तर सोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराने पोलिसांना मार्ग दाखवला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबई पोलिसांची अनोखी कामगिरी महिलेला परत मिळाले ५ लाखांचे दागिने पोलिसांनी उंदराचा पाठलाग करून सोन्याचे दागिने जप्त केले.