रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (11:27 IST)

गावी जाण्यासाठी महिलेला पांढऱ्या कपड्यात गुंडाळले, बिंग उघडं पडलं

देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. संचारबंदीमुळे जिल्ह्यांच्या सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत अशात आपल्या गावी जाण्यासाठी दोन तरुणांनी स्वत:च्या काकीला मृत झाल्याचे सांगितलं आणि विचित्र प्रकार घडवून आणला.
 
मुंबईहून दोन तरुणांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला पण सहजासहजी असे होणे शक्य नाही म्हणून त्यांनी घराच्या लोकांच्या मदतीने एक नाटक तयार केलं. तरुणांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आपल्या नात्यात असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून जाण्याची परवानगी मागितली. ऑन ड्यूटी पोलिसांना शंका आली म्हणून त्यांनी घरी व्हिडिओ कॉल लावला परंतू घरचे देखील नाटकामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनीही महिलेचा मृत्यू झाल्याची साक्ष दिली आणि पोलिसांसमोर पांढर्‍या कपड्यात महिलेला गुंडाळलेलं दाखवलं. ही महिलादेखील मरण पावल्याचं नाटक करत होती. 
 
मात्र पोलिसांना विश्वास बसला नसल्यामुळे त्यांनी गावात फोन करुन चौकशी केल्यावर हा खोटा प्रकार असल्याचं कळून आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची दुचाकी जप्त केली आहे.