रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (09:41 IST)

मुंबईत कबड्डी खेळताना मैदानात मृत्यू Video Viral

मुंबईतील मालाड परिसरातून एक वेदनादायक बातमी समोर येत आहे. जिथे कबड्डी खेळताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मालाड येथील महापालिकेच्या (बीएमसी) लव्ह गार्डनमध्ये कबड्डी स्पर्धा सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तिकराज मल्लन (20) असे मृताचे नाव आहे. कीर्तिकराज हा बीकॉमचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मित्तल कॉलेजतर्फे गुरुवारी मालाड पश्चिम येथील बीएमसीच्या लव्ह गार्डनमध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तिकराज हा दिंडोशीतील संतोष नगर भागातील रहिवासी आहे. तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बी.कॉमच्या प्रथम वर्षात शिकत होता. मृत विद्यार्थ्याला मित्तल विद्यालयातून खेळण्यासाठी बोलावण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कबड्डीचा सामना सुरू असताना विद्यार्थी कीर्तिकराजचा अपघाती मृत्यू झाला.
 
कीर्तिकराज मित्तल कॉलेजकडून खेळत होता. यावेळी आकाश कॉलेज विरुद्ध मित्तल कॉलेज यांच्यात कबड्डीचा सामना सुरू होता. खेळ सुरू असताना कीर्तिकराज काही खेळाडूंसह जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तत्काळ मालाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि कीर्तिकराजला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी किर्तिकराजला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.