शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (11:43 IST)

मुंबईत शाळा सुरु होणार ? आज होणार निर्णय

राज्यातील सर्व शाळा उद्या पासून म्हणजे 1 डिसेंबर पासून सुरु होण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. परंतु सध्या कोरोनाचे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. सध्या नाशिक मध्ये देखील 1 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर 10 तारखे पर्यंत स्थगिती आणली आहे. शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्याच्या सूचना जरी देण्यात आला आहे तरी ही  जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर अंमलबजावणीची जबाबदारी दिली जाणार आहे .मुंबईत प्राथमिक विभागाच्या  शाळा सुरु होणार की नाही या बाबतचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार. महापालिका आयुक्त्यांच्या निर्णयानंतरच या नंतरच मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय  आणि त्यासंबधी सूचना शाळा व्यवस्थापनांना देण्यात येईल अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी दिली. 
शाळा उघडण्यासाठीची सर्व खबरदारी आणि कोरोनानियमांचे पालन करण्यासाठीची सर्व तयारी शिक्षण विभागाकडून केली जात आहे. इमारतींना निर्जंतुक केले जात आहे. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना  वारंवार हात धुण्यासाठी साबण ,मास्क पुरवठा , प्रवेशद्वारावर तापमान तपासणीची सुविधा साठी आवश्यक तयारी केली जात आहे.