शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (22:21 IST)

चिंताजनक, मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सील

राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. दरम्यान, मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत. यात 20 टक्के पेक्षा जास्त लोक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दादर आणि दादर पार्क येथील भागात कंटन्मेंट झोन करण्यात आला आहे. माहिम आणि धारावी येथेही मोठ्या प्रणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईत 300 पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या  आहेत. राज्यात मुंबई, पुणे  हे जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत.