1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2013 (17:39 IST)

चंद्राबाबू नायडू यांची प्रकृती खालावली; पोलिसांनीच हलविले रुग्णालयात

WD
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरून राजधानी दिल्लीतील आंध्र भवनासमोर गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची आज (शुक्रवार) अचानक प्रकृती खालावली. त्यानंतर पोलिसांनी नायडू यांना राम मनोहर लोहिया रुग्णालात दाखल केले आहे.

पोलिसांसह समर्थकांनी नायडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु मात्र, नायडू यांनी नकार दिला होता.

दरम्यान, निवासी जिल्हाधिकारी यांनी चंद्राबाबू नायडू यांना आंध्र भवन सोडण्याप्रकरणी नोटीस बचावली होती. चंद्राबाबू यांना आंध्र भवन केवळ पत्रकार परिषद घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी तेथेच आपले उपोषण सुरु केले होते.