1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , बुधवार, 20 जानेवारी 2016 (12:45 IST)

तत्काल तिकिटांच्या नियमांमध्ये बदल, चुकीची माहिती देणार्‍याला तुरुंग

तत्काल तिकिटांना बुक करणे नेहमीच फार मोठे आव्हान असत. अशात दलालांचा हस्तक्षेप संपवण्यासाठी आता आयआरसीटीसी तत्काल तिकिट बुक करणार्‍या व्यक्तीला फोन करून पॅसेंजरचे सत्यापण करेल. आता तत्काल तिकिट बुक करणार्‍या व्यक्तीला फोन करून त्याच्याबद्दल माहिती घेण्यात येईल. अशात ज्याच्या नावाने तिकिट बुक केले आहे त्यांनी जर खरी माहिती दिली नाही तर त्याचे तिकिट रद्द करण्यात येईल.  
 
रेल्वे अशा लोकांचे फक्त तिकिटच रद्द करणार नाही बलकी त्यांच्याविरद्ध कायदेशीर कारवाई देखील करेल. स्लीपर क्लासमध्ये तत्काल तिकिट सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत करण्यात येते आणि एसी तिकिट 10 ते 11 वाजेपर्यंत. पण ज्याप्रकारे काहीच मिनिटांमध्ये तत्काल तिकिट पूर्णपणे बुक होऊन जातात त्याला लक्षात ठेवून नवीन व्यवस्थेला रेल्वेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे दलाल बर्‍याच वेळेपासून तत्काल तिकिट बुक करत आले असून ते काही मिनिटांमध्ये तत्काल तिकिटांचा मोठा कोटा चट करून जातात. याला लक्षात ठेवून या नवीन व्यवस्थेला सुरू करण्यात आले आहे. आता प्रवाशांना फोन करून त्यांच्याकडून नाव, पत्ता आणि फोन नंबरचे सत्यापण केले जाईल. एवढंच नव्हे तर ज्या बँकेतून तिकिट बुक करण्यात आले आहे त्याची माहिती देखील मागण्यात येईल. पण यातून एकही उत्तर चुकीचे ठरले तर तिकिट रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.